Manasvi Choudhary
ऑफिस, शाळेत जेवणासाठी आपण डब्बा नेतो. रोज वापरणाऱ्या जेवणाच्या डब्ब्यावर तेलकट डाग पडतात. प्लास्टिकच्या डब्ब्यामध्ये भाज्या ठेवल्यानंतर अनेकदा तेलकट डाग पडतात.
भाजीचे पिवळे हट्टी डाग कितीही घासले तरी स्वच्छ होत नाही, अशावेळी नेमके काय करायचं, ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
काही घरगुती टिप्सने तुम्ही टिफीनवरचे तेलट डाग सहजरित्या काढू शकता.
स्वयंपाकघरातील बेकिंग सोडा, लिंबू, व्हिनेगर आणि गरम पाणी हे वापरून तुम्ही टिफीनवरील तेलकट डाग काढा.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून डब्ब्याला लावा आणि १० मिनिटे ठेवा नंतर डब्बा धुवून टाका.
पांढरे व्हिनेगर डब्यांवरील पिवळे डाग सहज काढते. कोमट पाण्यता व्हिनेगर मिक्स करून डब्याला लावा आणि १० मिनिटे ठेवून नंतर धुवून टाका.
डाग पडलेल्या जागेवर तुम्ही टूथपेस्ट लावून ५ मिनिटे तसेच ठेवा नंतर ब्रशने घासा डबा नव्याने चमकेल.