Manasvi Choudhary
अनेकांना हसताना आणि बोलताना अवघडल्यासारखे वाटते याचे मुख्य कारण म्हणजे दातांचा पिवळेपणा. दातांवर पिवळा थर जमा होतो यामुळे बोलताना किंवा हसताना दात पिवळे दिसतात.
तोंड उघडताच पिवळे आणि घाणेरडे दात दिसले की आपल्याला लाज वाटू लागते. दात साफ करण्यासाठी आपण अनेक महागड्या टूथपेस्टचा वापर करतो परंतू आज आम्ही तुम्हाला घरगुती सोपे उपाय सांगणार आहेत.
बेकिंग सोड्यात लिंबाचा रस किंवा पाणी मिसळून ही पेस्ट तुम्ही दातांवर हलक्या हाताने घासा यामुळे दातांवरील पिवळा थर कमी होईल
केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असते, जे दातांवरील डाग घालवण्यास मदत करतात.
मोहरीच्या तेलात चिमूटभर हळद आणि थोडे मीठ मिसळा. या मिश्रणाने दातांना मसाज करा. यामुळे हिरड्याही मजबूत होतात.
कोळशाची पावडर बोटाने किंवा ब्रशने दातांवर हलकी चोळा आणि २ मिनिटांनी धुवून टाका.
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.