Surabhi Jayashree Jagdish
काळीकुट्ट झालेली चहाची गाळणी ही जवळपास प्रत्येक घरातली सामान्य समस्या आहे. सतत वापरामुळे त्यावर चहाचे डाग आणि तेलकट थर साचत जातात. ही साफ करण्याचे काही सोपे उपाय आहेत. हे उपाय कोणते ते पाहूयात.
बेकिंग सोडा हा नैसर्गिक क्लिनर आहे जो हट्टी डाग सहज काढतो. गाळणीवर बेकिंग सोडा शिंपडून त्यावर थोडं गरम पाणी टाकावं. काही मिनिटांनी ब्रशने घासल्यास काळेपणा निघून जातो.
व्हिनेगरमध्ये असलेले अॅसिड डाग काढण्यासाठी खूप प्रभावी असते. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात व्हिनेगर मिसळा आणि गाळणी 15-20 मिनिटे त्यात ठेवा. नंतर हलक्या हाताने घासल्यास गाळणी स्वच्छ होते.
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात जे डाग कमी करतात. लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून गाळणीवर चोळा. थोड्या वेळाने पाण्याने धुतल्यास चमक परत येते.
सामान्य डिशवॉश लिक्विडही चांगला पर्याय ठरू शकतो. गरम पाण्यात लिक्विड मिसळून त्यात गाळणी भिजत ठेवा. काही वेळानंतर ब्रशने स्वच्छ केल्यास तेलकटपणा निघतो.
दोन्ही गोष्टी एकत्र केल्यास रिअॅक्शनमुळे जोरदार स्वच्छता होते. गाळणीवर बेकिंग सोडा टाकून त्यावर व्हिनेगर ओता आणि फेस येऊ द्या. त्यानंतर घासल्यास हट्टी डाग सहज निघतात.
गाळणीच्या बारीक जाळीत अडकलेली घाण काढण्यासाठी जुना टूथब्रश तुम्ही वापरू शकता. तो छोट्या जागेत सहज पोहोचतो आणि नीट स्वच्छता करतो. नियमित वापर केल्यास गाळणी लवकर खराब होत नाही.