Saam Tv
कपड्यांवरचे काही डाग कितीही घासले तरी निघतच नाही. त्यामुळे कपडे आवडते असले तरी वापरता येत नाही. मग आपण डाग काढण्यासाठी अनेक उपाय करत असतो.
तेलाचे डाग प्रचंड हट्टी असतात. त्या डागांवर डिश वॉश किंवा बेकिंग सोडा लावा. 10 ते 15 मिनिटांनी हलक्या हातांनी धुवून घ्या.
चहाचे किंवा कॉफीचे डाग पडल्यास लगेचच थंड पाण्याने धुवा. मग लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर चोळून 10 मिनिटांनी धुवून टाका.
हळदीचे डाग फार हट्टी असताता ते सहज निघतच नाहीत. त्यामुळे हळदीच्या डागांवर स्टेन रिमूव्हर किंवा लिक्विड डिटर्जंटचा वापर करा.
शाईच्या डागांवर हा एकदम बेस्ट पर्याय आहे. डाग असलेल्या भागाखाली स्वच्छ रूमाल ठेवा. त्यावर अल्कोहोल किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटाइजर लावून हलक्या हाताने टॅप करा. यामुळे डाग क्षणातच होतील गायब
चिखलाच्या डागांना सुकू देऊ नका . सुकल्यास हे डाग निघून जाण कठीण होत. जिद्दी चिखलाच्या डागांवर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर चोळावे. 10 मिनिटांनंतर धुवून टाकावे.
काही कपड्यांवर केअर लेबल लावलेले असते. त्यावर कपड्यांवरील डाग काढण्याचे उपायही असतात तसे केल्यानेही डाग लवकर निघू शकतात.
डाग जितक्या लवकर स्वच्छ करता येईल तितक्या लवकर करावा. कारण डाग जास्त वेळ राहिला, तो सुकला तर कोणताही डाग निघणे कठीण होते.