Kitchen Hacks : किचनमधील चिकट डब्बे कसे साफ करावे? जाणून घ्या सोप्या पद्धती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किचनमधील चिकट डब्बे

किचनमधील डब्बे दर १५ दिवसांनी घासणे स्वच्छ करणे गरजेचे असते. स्वच्छता न केल्यास डब्यांना कीटक लागतात आणि डब्यांना बुरशी येण्यास सुरवात होते.

Kitchen Hacks | GOOGLE

चिकट डब्बे

स्वयंपाकघरातील डब्बे अनेकदा घाण आणि तेलामुळे चिकट होतात. नंतर ते घाणेरडे दिसू लागतात.

Kitchen Hacks | GOOGLE

कसे साफ करावे

घरातील चिकट झालेले डब्बे कसे साफ करावे हे सोप्या पध्दतीने जाणून घ्या.

Kitchen Hacks | GOOGLE

डब्बे भिजत ठेवा

गरम पाणी करत ठेवा. पाणी गरम झाल्यावर टपामध्ये ओता आणि चिकट झालेल्या डब्ब्यांना गरम पाण्यात भिजत ठेवा.

Kitchen Hacks | GOOGLE

मिश्रण तयार करा

आता १ ग्लास पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा, २ चमचे व्हिनेगर आणि सर्फ पावडर मिसळा.

Kitchen Hacks | GOOGLE

साफ करा

आता हे तयार केलेले मिश्रण स्पंजवर लावा आणि डब्ब्यांना आणि झाकणांना लावून स्वच्छ करा.

Kitchen Hacks | GOOGLE

पाण्यात धुवून घ्या

डब्ब्यांमधून घाण काढून टाका. नंतर, डब्बे स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे होऊ द्या.

Kitchen Hacks | GOOGLE

लिंबाचे साल

जर तुमच्याकडे बेकिंग सोडा उपलब्ध नसेल तर लिंबाच्या सालावर मीठ लावा आणि डब्यांवर चांगले घासून घ्या. असे केल्यास चिकटपणा निघून जाईल.

Kitchen Hacks | GOOGLE

Kitchen Hacks : टोमॅटो मऊ पडतात आणि पाणीही सुटतं? मग फॉलो करा या टिप्स

Tomato | GOOGLE
येथे क्लिक करा