Diwali Light Bulb Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील बल्ब कसे चमकवायचे? बल्ब स्वच्छ करण्याच्या ५ सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी सणापूर्वी घराची साफसफाई केली जाते.फरशी, पंखे, खिडक्यांच्या जाळ्या, ग्रील आणि आरसे स्वच्छ करतो. मात्र, अनेकदा आपल्याकडून घरातील बल्ब आणि ट्यूबलाईट्स स्वच्छ करण्याचे टाळतो.

Diwali Cleaning | saam tv

बल्बची स्वच्छता

परंतु, बल्बवर धुळीचा थर जमा झालेला असतो, तर स्वयंपाकघरातील बल्बवर फोडणीच्या तेलाचा आणि धुराचा चिकट थर साचतो. यामुळे बल्बचा प्रकाश मंद होतो आणि घर अंधुक दिसू लागते.

Diwali Light Bulb Cleaning Tips

बल्ब स्वच्छ करण्याच्या ५ सोप्या व सुरक्षित ट्रिक्स

तुम्हालाही जर दिवाळीत घर चमकवायचे असेल, तर बल्ब स्वच्छ करण्याच्या ५ सोप्या व सुरक्षित ट्रिक्स जाणून घ्या.

pre diwali bulb cleaning tips

पॉवर बंद करा आणि बल्ब पूर्ण थंड होऊ द्या

बल्ब साफ करण्यापूर्वी मुख्य पॉवर स्विच किंवा बोर्डावरील बटण आवर्जून बंद करा.

जर बल्ब चालू असेल तर तो खूप गरम असतो. त्यामुळे त्याला लगेच हात लावू नका.

बल्ब पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मऊ सुती कपड्याच्या मदतीने होल्डरमधून बाहेर काढा.

Safety First

मऊ आणि कोरड्या कपड्याने धूळ साफ करा

हॉल किंवा बेडरूममधील बल्बवर फक्त कोरडी धूळ असते. यासाठी मायक्रोफायबर कापड किंवा मऊ सुती कापड घ्या.

बल्बचा बाहेरील भाग हळुवारपणे पुसून घ्या. यामुळे जमा झालेली धूळ लगेच निघून जाईल आणि प्रकाश स्पष्ट पडेल.

Safety First

किचनच्या तेलकट बल्बसाठी सौम्य साबणाचा वापर

किचनमधील बल्बवर साचलेला चिकटपणा घालवण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात २ थेंब सौम्य भांडी धुण्याचे लिक्विड किंवा डिटर्जंट मिक्स करा.

त्यात मऊ कापड भिजवा आणि कापड पूर्णपणे घट्ट पिळून घ्या जेणेकरून त्यातून पाण्याचा थेंबही गळणार नाही. या ओलसर कपड्याने बल्बचा बाहेरील काच पुसून घ्या.

Safety First

धातूच्या भागावर पाणी जाणे टाळा

बल्ब पुसताना त्याचा मागील धातूचा भाग अजिबात ओला होणार नाही याची काळजी घ्या. पाण्याचा संपर्क आल्यास शॉर्ट सर्किट होण्याचा किंवा बल्ब खराब होण्याचा धोका असतो.

Safety First

पूर्ण कोरडे झाल्यावरच बल्ब होल्डरमध्ये पुन्हा बसवा

बल्ब ओलसर कपड्याने पुसल्यानंतर तो काही वेळ वाळू द्या. बल्ब पूर्णपणे कोरडा झाल्याची खात्री झाल्यावरच तो पुन्हा होल्डरमध्ये बसवा आणि स्विच चालू करा. तुम्हाला प्रकाशात लगेचच मोठा फरक जाणवेल.

Safety First

NEXT: Cotton Saree Designs For Women: दिवाळीसाठी कॉटनच्या साड्या डिझाईन्स, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Cotton Saree Designs For Women
येथे क्लिक करा...