ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल, प्रत्येक किचनमध्ये एकापेक्षा एक जास्त मॉड्यूलर स्टोव्ह असतात, परंतु त्या सर्वांमध्ये बर्नर सारखाच असतो.
अनेकदा बर्नरवर घाण साचते. हि घाण स्वयंपाक करताना किंवा जास्त जळल्यामुळे होऊ शकते.
बर्नर खराब झाल्यावर स्टोव्हचा फ्लेम कमी होतो आणि गॅस जास्त प्रमाणात वाया जातो.
जर तुमचे बर्नर सुध्दा घाण झाले असेल तर कसे साफ करायचे ते जाणून घ्या.
सर्वात आधी बर्नरला थंड पाण्यात टाका. असे केल्यास बर्नर थोडा भिजला जाईल.
आता गरम पाण्यात १ पॅकेट ईनो, बेकिंग सोडा आणि लिंबूचा रस टाकून मिश्रण तयार करा.
तयार केलेल्या गरम पाण्याच्या मिश्रणात बर्नरला अर्ध्या तासाकरिता टाका.
नंतर छोट्या ब्रशच्या साहाय्याने बर्नरला साफ करा. सगळी साठलेली घाण निघून जाईल.
यानंतर स्वच्छ पाण्याने बर्नरला धुवून कपड्याने पुसा. पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर बर्नरला पुन्हा गॅसवर सेट करा.