Kitchen Cleaning Hacks : खराब झालेले लाकडी पोळपाट कसे कराल साफ ? या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाकडी पोळपाट लाटणे

लाकडी पोळपाट लाटणे वारंवार चिकट होणे किंवा त्यातून विचित्र वास येणे याचे मुख्य कारण म्हणजे ते नीट स्वच्छ न होणे, म्हणून पोळपाट लाटण्याची स्वच्छता ठेवणे गरजेचे मानले जाते.

Polpat Latane | GOOGLE

सुकलेले पीठ काढूण टाकणे

पोळपाटावर किंवा लाटण्यावर लागलेले सुकलेले पीठ स्क्रॅपरने किंवा कोरड्या कपड्याने काढून टाका.

Polpat Latane | GOOGLE

हलक्या ओल्या कपड्याने पुसा

कोमट पाण्यात भिजवलेला हलका ओला कपडा घ्या आणि पोळपाट लाटणे पुसा. फार पाण्यात धुवू नका कारण लाकूड खराब होऊ शकतं.

Polpat Latane | GOOGLE

साबण टाळा

लाकडी पोळपाट लाटण्यांसाठी हार्ष केमिकल किंवा जास्त साबण वापरू नये. फक्त १–२ थेंब सौम्य लिक्विड वापरावे.

Polpat Latane | GOOGLE

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मीठ हे नैसर्गिक क्लीनर आहे. पोळपाटावर मीठ शिंपडा आणि लिंबूने गोल गोल फिरवत घासा. याने डाग, वास आणि जंतू सहज निघून जातात.

Polpat Latane | GOOGLE

स्वच्छ पुसून कोरडे करा

घासल्यानंतर स्वच्छ पाण्याने हलकेच पुसा आणि लगेचच सुक्या कपड्याने कोरडे करा.

Polpat Latane | GOOGLE

सूर्यप्रकाशात सुकवू नका

जास्त उन्हात ठेवल्यास लाकूड कोरडे पडून क्रॅक जाऊ शकते म्हणून घरातच सावलीत ठेऊन नैसर्गिकरीत्या वाळू द्या.

Polpat Latane | GOOGLE

आठवड्यातून एकदा तेल लावा

नारळतेल किंवा मोहरीचे तेल हलक्या हाताने पोळपाट लाटण्यावर लावा.यामुळे पोळपाट टिकाऊ, गुळगुळीत आणि सुरक्षित राहिल.

Polpat Latane | GOOGLE

वापरानंतर योग्य स्टोरेज

लाटणे कोरडे झाल्यावरच त्याच्या योग्य त्या जागी ठेवा. तसेच पोळपाट उभा ठेवला तर ओलावा साठत नाही आणि बुरशीही होत नाही.

Polpat Latane | GOOGLE

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Kitchen | GOOGLE
येथे क्लिक करा