Manasvi Choudhary
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत गऍ हा वापरला जातो. गॅसचा वापर नियमितपणे केला जातो गॅसवर विविध पदार्थ बनवले जातात
यामुळे कधीकधी गॅसचे बर्नर देखील खराब होतात, कधी कधी तर गॅस बर्नरवर तेल, मसाले, दूध देखील पडते.
गॅस बर्नरची स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. गॅस बर्नरवर नियमितपणे पदार्थ पडल्याने ते लवकर खराब होतात. अशावेळी गॅस बर्नर स्वच्छ करायचे असतात त्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
गॅस बर्नरवर साठलेला तेलकटपणा साफ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडाचा उपयोग करू शकता. बर्नरवर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा लावल्यानंतर ते अर्धा तास भिजून ठेवा यामुळे बर्नर चमकेल.
बर्नरवर तेलकट, चिकटपणा झाला असेल तर तुम्ही गरम पाण्यात भिजत ठेवा नंतर सहजपणे तुम्ही ते धुवून शकता.
गॅस बर्नरव लहान लहान भांगामध्ये घाण साचलेली असते. अशावेळी तुम्ही टूथब्रशच्या सहाय्याने ती घाण काढू शकता.
लिंबाचा रस हा क्लिजिंग म्हणून प्रभावी आहे. स्वयंपाकघरातील अनेक उपायांवर लिंबू काम करते. गॅसच्या बर्नर लिंबाचा रस लावल्याने बर्नर स्वच्छ होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.