Manasvi Choudhary
उन्हाळ्यात अनेकजण थंड पाणी पितात यामुळे फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्याचा वापर अधिक वाढतो.
फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या वेळच्या वेळी स्वच्छ करणे महत्वाचे आहे. अनेकजण पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करत नाही यामुळे त्यात बॅक्टेरिया जमतात.
पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरीच सोप्या टिप्सचा उपयोग करू शकता.
दररोज वापरायच्या किती दिवसांनी आणि कशी स्वच्छ करायच्या? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी आणि मीठ वापरा. बाटलीमध्ये कोमट पाण्यात मीठ मिक्स करून टाका. मीठ हे नैसर्गिकरित्या बाटली स्वच्छ करते. घाण, मैल निघते.
बेकिंग सोडा आणि लिंबाने बाटली स्वच्छ करा. त्यानंतर ब्रशने घासा आणि धुवा. बाटली बेकिंग सोडाने साफ केल्याने वास येत नाही.
बाटलीला तेलकट डाग लागले असतील तर व्हिनेगरचा वापर करा. पांढऱ्या व्हिनेगरने बाटलीचे डाग निघती बाटली नवीन दिसेल.
बाटली स्वच्छ करताना त्याचे झाकण देखील स्वच्छ करावे. बारीक ब्रशच्या सहाय्याने तुम्ही बाटलीचे झाकण स्वच्छ करणे महत्वाचे आहे.