ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या घरांमध्ये बाल्कनी दरवाजे हे काचेचे असतात. काचेच्या दरवाजांवर सतत हात लावल्याने दरवाजे घाण होतात.
बाल्कनीचे काचेचे दरवाजे वारंवार उघड-बंद केल्यामुळे त्यांच्यावर डाग पडतात आणि खराब होतात. पण पडलेले डाग नंतर काढणे कठीण होते.
बाल्कनीचे काचेचे दरवाजे स्वच्छ करण्यासाठी काय करावे लागेल, हे जाणून घ्या.
१ कप व्हिनेगर घ्या आणि त्यात पाणी मिक्स करा. या केलेल्या मिश्रणाला कपड्यावर लावून काच साफ करा.
काचेवर पाणी शिंपडा आणि नंतर पेपेरने साफ करा. याने काचेवर पडलेले डाग धब्बे पूर्ण साफ होतील.
कोमच पाण्यात लिंबू आणि मीठाचे मिश्रण बनवा आणि मिक्स करुन घ्या. मग या तयार केलेल्या पाण्याला काचेवर ५ मिनिटे लावा आणि साफ कपड्याने पुसून घ्या.
बेकिंग सोडा हा डाग धब्यांना लगेचचं घालवण्यास मदत करतो. कोमट पाण्यात बेकिंग सोडो मिक्स करा. तयार केलेल्या पाण्यात कपडा बुडवा आणि काच साफ करा.
यामधील तुमच्याकडे कोणतीच गोष्ट नसेल तर, पाण्यात डिशवॉश लिक्विड मिक्स करुन पाण्यात कपडा बुडवा आणि काच साफ करा. नंतर मग सुक्या कपड्याने पुसून घ्या.