Saam Tv
स्प्रे बॉटलमध्ये व्हाईट व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. आरश्यावर स्प्रे करताना मायक्रोफायबर कापडाने वर-खाली या दिशेने पुसा. यामुळे आरश्यांवरील डाग निघून जातील.
लिंबाच्या रसात पाणी मिसळा. हे पाणी कापडावर घ्या. हलक्या हाताने आरसे पुसा. त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. आरसा दिसेल अगदी लख्ख
आरशांवर तेलकट डाग पडले असतील तर यासाठी डिशवॉशिंग लिक्क्विडचा देखील वापर करू शकता. शेवटी मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. आरसा एकदम चकाचक होईल.
रोजची स्वच्छता करताना आरसा पुसत असाल तर रसायनांचा वापर टाळू शकता. कोमट पाण्यात मायक्रोफायबर कापड भिजवून आरसा पुसला तरीही डाग सहज स्वच्छ होतात.
जेल नसलेली साधी पांढरी टुथपेस्ट आरशाच्या डागांवर लावा. थोड्या वेळाने मऊ कापडाने पुसून घ्या. आरसा चमकू लागेल.
त्वचेवरील काळेपणा काढण्यासाठी बटाट्याच्या रस वापरला जातो. तसाच त्याचा वापर डाग काढण्यासाठी देखील केला जातो. बटाट्याचा तुकडा डांगावर चोळा आणि कोमट पाण्याने पुसून घ्या.