ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एकीकडे टेक्नॉलॉजीचा विस्तार होत आहे तर दुसरीकडे सायबर क्राइमच्या घटना झपाट्याने वाढत आहेत.
अशावेळी सायबर क्राइमपासून आपल्याला अलर्ट राहण्याची गरज असते. जर तुमच्या फोनमध्ये या ५ गोष्टी दिसल्यास तर याकडे दुर्लक्ष करु नका. तुमचा फोन हॅक होऊ शकतो.
जर तुमच्या फोनमध्ये असे अॅप्स दिसत असतील जे तुम्ही डाउनलोड केलेले नाही. तर सावध व्हा. कारण हे अॅप्स ट्रोजन किंवा स्पायवेअर असू शकते. यांना लगेच अनइन्सटॉल करा.
जर फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर याचा अर्थ बॅकग्राउंड प्रोसेस चालू आहे. फोनचा डेटा हॅकर्सला पाठवला जाऊ शकतो.
जर तुमचा फोन अचानक स्लो झाला असेल तर हे मालवेअर किंवा स्पायवेअर सक्रिय झाल्याचे संकेत असू शकते.
ब्राउजर आपोआप उघडणे किंवा, वारंवार पॉप अप जाहीरात दिसणे हे देखील मालवेअरचे संकेत असू शकते. याला दुर्लक्ष करु नका.
जर मोबाईलचा डेटा किंवा वाय-फायचा वापर सामान्यपेक्षा अधिक वाढला असेल. तर तुमच्या फोनमधून डेटा अज्ञात सर्व्हरला पाठवला जाऊ शकतो.