Sakshi Sunil Jadhav
तुमच्या पगारातून दरमहिन्याला पीएफ कापला जात असेल, तर EPFO पासबुकमध्ये कंपनीने तुमचे योगदान वेळेवर जमा केले आहे की नाही, हे तपासणे तुमचा अधिकार आहे.
EPFO Member Passbook Portal वर UAN आणि पासवर्डने लॉगिन करून संबंधित मेंबर आयडी निवडा आणि View Passbook वर क्लिक करा.
पासबुकमध्ये दर महिन्याला तुमचे कर्मचारी योगदान, Employer Share आणि संबंधित व्यवहाराची नोंद पाहता येते, त्यामुळे कंपनीने रक्कम जमा केली आहे की नाही हे स्पष्ट होतं.
UMANG ॲपमध्ये EPFO सेवा निवडून ‘View Passbook’ वर क्लिक करा आणि UAN व OTPच्या मदतीने तुमच्या पीएफ खात्यातले महिन्यानुसार व्यवहार पाहा.
नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या EPFO क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन PF खात्याची उपलब्ध माहिती एसएमएसद्वारे मिळवता येतो.
नोंदणीकृत मोबाईलवरून EPFOHO UAN MAR असा SMS 7738299899 या क्रमांकावर पाठवून PF योगदानाची माहिती मिळवता येते.
पगारातून कर्मचारी योगदान कापले गेले असूनही ते PF पासबुकमध्ये दिसत नसेल, तर कंपनीकडून योगदान जमा करण्यात विलंब किंवा इतर समस्या असू शकतात.
PF योगदान जमा झालं नसल्याचे आढळल्यास कर्मचाऱ्यांना EPFOकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे. पगाराच्या स्लिप, PF संबंधित नोंदी आणि इतर पुरावे जतन करून ठेवणे उपयुक्त ठरते.