Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा अक्षय्य तृतीया हा सण ३० एप्रिलला साजरा केला जातो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असतो.
या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
अक्षय्य तृतीयेला पिवळी फुले, कमळाची फुले देवाला अर्पण केली जातात.
अक्षय्य तृतीयेला दान करणे शुभ मानलं जातं.
एखाद्या नवीन कार्याची सुरूवात तुम्ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू शकता.
अक्षय्य तृतीया ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी विवाह करणे अत्यंत शुभ मानले जाते.