Sakshi Sunil Jadhav
टॅटू काढण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
नाजुकसा टॅटू हा आपली सुंदरता वाढवण्याचे काम करत असतो.
टॅटू काढल्यावर त्याची काळजी घेणे सुद्धा खूप महत्वाचे असते.
टॅटू काढल्यावर तुम्ही काळजी घेणं टाळलं तर तुम्हाला इन्फेक्शन किंवा विविध पद्धतीच्या जखमा होऊ शकतात.
नेहमी लक्षात ठेवा टॅटू काढल्यावर लगेचच त्यावर पट्टी बांधून ठेवा.
पट्टी बांधल्याने धूळ, माती, बॅक्टेरिया यापासून तुमचे संरक्षण होते.
पट्टी काढल्यांनतर तुमचा टॅटू कोमट पाण्याने हळुवार धुवा. स्पंजने सॉफ्ट कापडाने पुसून घ्या.
हानिकारक सुर्यकिरणांमुळे टॅटूचा रंग फिकट होऊ शकतो आणि बरा होण्याची प्रक्रिया मंदावू शकते.
टॅटू बरा होत असताना त्याला थोडीशी खाज येऊ शकते. म्हणून टॅटूला खाजवू नका. सैल कपडे वापरा जेणेकरून टॅटूला हवा मिळेल आणि तो सहज बरा होईल.