Dry Lips Care Tips: कोरड्या ओठांवर 5 घरगुती उपाय, ओठ होतील मऊ आणि मुलायम

Manasvi Choudhary

ओठ कोरडे पडणे

हवामानातील बदलामुळे किंवा शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे पडणे किंवा फाटणे ही समस्या उद्भवते.

Dry Lips Care Tips

मऊ ओठ

कोरड्या ओठांवर तुम्ही घरीच सोपे उपाय करू शकता यामुळे ओठ मऊ आणि मुलायम राहतील.

lips care | yandex

मध

मध ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा १५ ते २०मिनिटांनी ओल्या कापडाने ओठ पुसून घ्या. यामुळे ओठ हायड्रेट होतात.

honey | GOOGLE

साजूक तूप लावा

रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे कोमट साजूक तूप लावा. यामुळे फाटलेले ओठ बरे होतात.

ghee | yandex

कोरफड जेल

कोरफडचा गर ओठांवर लावल्याने नैसर्गिक जेल मिळतो यामुळे ओठांवरील मृत पेशी निघून नवीन त्वचा येते.

Aloe vera Gel | GOOGLE

नारळ तेल लावा

दिवसातून २-३ वेळा नारळ तेलाचे काही थेंब ओठांना लावा. हे नैसर्गिक 'लिप बाम'सारखे काम करते आणि ओठांना जंतूंपासूनही वाचवते.

Coconut oil | yandex

साखर आणि तेल लावा

अर्धा चमचा साखरेत थोडे मध किंवा तेल मिसळा. या मिश्रणाने ओठांवर १-२ मिनिटे अतिशय हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ मऊ होतील.

sugar and oil

next: Idli Chutney Recipe: इडलीसोबत खातात ती खोबऱ्याची चटणी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...