Manasvi Choudhary
पावसाळ्यात सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे छत्री.
अशातच आता नवीन छत्री खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया.
छत्री खरेदी करताना त्याचा फ्रेम हा मजबूत असावा ज्यामुळे जोरदार वाऱ्याच्या वेगातही छत्री तुटणार किंवा उडणार नाही.
छत्री विकत घेताना त्याचे कापड पूर्णत: वॉटरप्रूफ असावे.
छत्री ही ऑटोमॅटिक किंवा सेमीऑटोमॅटिक असावी हे तपासून घ्या ज्यामुळे छत्री सहज उघडता येईल.
छत्रीचे वजन हलके असावे ज्यामुळे ती सहज कुठेही घेऊन जाता येईल.
ट्रॅव्हलसाठी किंवा बॅगमध्ये ठेवण्यासाठी फोल्डिंगची छत्री निवडा.
छत्रीचा रंग किंवा डिझाईनसह टिकाऊपणा असलेल्या छत्रीला प्राधान्य द्या.