ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा तुमचा मोबाईल फोन जुना झाला की वारंवार अनेक फंक्शन स्लो होतात .
चला तर मग पाहूयात अशा स्थितीत काय उपाय करावेत.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
जेव्हा आपण कमी बजेटचा किंवा महागातला फोन जरी घेतला तेव्हा प्रत्येक मोबाईल फोनचे स्पीड उत्तम असते.
अनेकांना जसा मोबाईल फोन जुना होतो म्हणून त्याचे फंक्शन स्लो चालतात असे वाटते.
मर्यादित स्टोरेज
मोबाईलचे स्पीड चांगले ठेवण्यासाठी कधीच मोबाईल फोनमधील स्टोरेज फुल होऊन देऊ नका.
मोबाईलमधील अनेक फोटो असतील तसेच व्हिडिओ असतील तर ते एक्सटर्नल मेमरीमध्ये ट्रान्सफर करु घ्यावेत.
जेव्हा आपण मोबाईलमध्ये नवीन ॲप डाउनलोड करतो तेव्हा कालांतराने हे अॅप अधिक मेमरी वापरते त्यामुळेही फोन स्लो होतो.
फोन स्पीड चांगले राहण्यासाठी काही अॅपचे बेब व्हर्जन वापरु शकता जेणेकरून मेमरी कमी वापरली जाते.