Immunity Booster : वारंवार आजारी पडताय? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Saam Tv

रोगप्रतिकारकशक्ती वाढवा

बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. रोगप्रतिकारकशक्ती एका दिवसात वाढत नाही, पण रोजच्या चांगल्या सवयी त्यासाठी नक्कीच मदत करू शकतात.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

आले आणि तुळस

किसलेले आले आणि तुळशीची पाने पाण्यात उकळून प्या. यामुळे घशाची खवखव आणि खोकला कमी होईल.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

आवळ्याचे ज्यूस

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि क जीवनसत्व असते. पचनशक्ती सुधारून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. ताप, खोकला आणि घशाची खवखव यावर आराम मिळतो.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

हळदीचे दूध प्या

हळद ही गुणकारी आणि पारंपारिक औषध आहे. रात्री कोमट दुधात थोडी हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. घश्यांच्या समस्यांना आराम मिळतो.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

आहारात लसूण आणि आले वापरा

लसूणात अॅलिसिन नावाचा घटक बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यास मदत करतो. आले खोकला आणि संसर्गापासून बचाव करते.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा

संत्र,मोसंबी,पेरू, पपई, यांसारखी फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे मिळतील.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

ड्रायफ्रुट्स खाणे केव्हाही चांगले

बदाम , अक्रोड, काजू आणि बिया यामध्ये फॅट्स, प्रोटीन, विविध पोषक घटक असतात. त्यामुळे दिवसातून एकदा ड्रायफ्रुट्स खावे.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

दररोज व्यायाम करा

चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम नियमित केल्याने शरीर सक्रिय राहते. रोजच्या रोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

TIPS TO BOOST IMMUNITY POWER | PINTREST

Detox Drinks : डिटॉक्स ड्रिंक्स प्या आणि दिवसभर राहा फ्रेश; घरच्या घरी बनवा हे 6 हेल्दी ड्रिंक्स

Healthy Detox Drinks | META AI
येथे क्लिक करा