Saam Tv
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि पुदीन्याची पाने टाका. व्यवस्थित मिक्स करा. या ड्रिंकमुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल .
काकडीचे काप आणि पुदिन्याची पाने पाण्यात 30 मिनिटे टाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी प्या. यामुळे थकवा जाणवणार नाही.
एका ग्लास पाण्यात किसलेले आले आणि लिंबाचा रस घाला. आल्याची चव तिखट असल्याने ते कमी प्रमाणात टाका. हे पेय कोमट पाण्यात देखील तयार करू शकता.
जिरा रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून घ्या. जिऱ्याचे पाणी हे पारंपरिक डिटॉक्स ड्रिंक आहे. यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते.
पाण्यात आवळ्याचा प्रमाणात आवळ्याचा रस मिसळा. आवळ्याची चव तुरट असल्याने प्रमाण व्यवस्थित असूद्या. आवळा हा सर्वगुण संपन्न आहे. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल. केसही मजबूत होतील.
पाण्यात संत्र्याचे काही काप आणि पुदिना मिक्स करा. १० मिनिटे पाण्यात काप टाकून चव मुरू द्या. यामुळे दिवसभर फ्रेशनेस टिकून राहील
सकाळी उठल्यावर, व्यायामानंतर किंवा दिवसभर हे डिटॉक्स ड्रिंक्स तुम्ही केव्हाही पिऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.