ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यामध्ये वातावरण बदलल्यामुळे सर्दी - खोकला लवकर पकडतो . त्यामुळे इम्यूनिटी मजबूत बनवणे गरजेचे आहे.
रोज सकाळी हळदीचे दूध पिल्याने शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
तुळस, आल आणि काळी मिरी याचा चहा पिल्याने घश्याचा संसर्ग टाळता येतो.
भिजवलेलं बदाम आणि अक्रोड रोज खाल्याने इम्युनिटी बूस्ट करण्यास मदत होते.
विटामिन आणि मिनरल्स मिळविण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे समाविष्ट करा.
चांगली झोप घेतल्याने आणि चिंता कमी केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आणि कोमट पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवणे.