ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या अनेक ठिकाणी कबुतरांचे मोठे थवे पाहायला मिळतात.
राज्यात चिमणी आणि कावळ्यांपेक्षा कबुतर पक्षांचे प्रमाण वाढल्याचं दिसत आहे.
लांबून कबुतर फार छान वाटतात. मात्र ते घराच्या गॅलरीत आलेलं अनेकांना आवडत नाही.
कबुतर इमारती असलेल्या परिसरात हमखास पाहायला मिळतात.
कबुतरांमुळे घराची बाल्कनी फार अस्वच्छ होते.
कबुतर तुमच्याही बाल्कनीपासून दूर पळू शकतात.
त्यासाठी कॅक्टसचं झाड तुम्ही घरातल्या कुंडीत लावाले. याला काटे असल्याने कबुतर तेथे येणार नाहीत.
तुम्ही कोरफड देखील बाल्कनीमध्ये ठेवू शकता. याच्या वासानेही कबुतर येत नाहीत.