Manasvi Choudhary
सनस्क्रिन चेहऱ्यावर लावणे हे त्वचेच्या काळजीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र योग्य वेळी योग्य सनस्क्रिन त्वचेवर लावणे महत्वाचे आहे.
चेहऱ्यावर सनस्क्रिन लावल्याने सूर्याच्य अतिनील किरणांपासून त्वचेचे सरंक्षण होते यासाठी सनस्क्रिन कधी आणि कसे लावावे हे जाणून घ्या.
घराबाहेर जाण्यापूर्वी किमान १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. जेणेकरून ते त्वचेमध्ये व्यवस्थित शोषले जाईल आणि संरक्षण सुरू होईल.
जरी तुम्ही घरात असाल, तरी खिडकीतून येणारी उन्हाची किरणे किंवा मोबाईल-लॅपटॉपच्या स्क्रीनमधून निघणारा 'ब्लू लाईट' त्वचेला हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे घरात असतानाही सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरते.
सनस्क्रिन लावण्याआधी फेसवॉशने चेहरा धुवून कोरडा करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर आधी मॉइश्चरायझर लावा आणि त्यानंतर सनस्क्रीन लावा.
फक्त चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतो, पण मान आणि कान उघडे राहिल्याने तिथे टॅनिंग लवकर होते.