Manasvi Choudhary
डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि पापण्या घनदाट दिसण्यासाठी मस्करा लावतात. मस्कारा डोळ्यांना लावण्याची योग्य पद्धत असते.
मस्कारा लावण्यापूर्वी डोळे आणि पापण्या स्वच्छ असाव्यात जर त्यावर आधीचा मेकअप किंवा तेल असेल तर मस्कारा नीट बसणार नाही.
जर तुम्हाला आयशॅडो किंवा आयलायनर लावायचे असेल, तर ते मस्कारा लावण्यापूर्वी लावून घ्या.
जर तुमच्याकडे आयलाश कर्लर असेल, तर मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांना १०-१५ सेकंद दाबून धरा. यामुळे पापण्या वरच्या बाजूला वळतात आणि डोळे मोठे दिसतात.
आरशात समोर बघून पापण्यांच्या मुळाशी ब्रश ठेवा. ब्रश मुळापासून टोकापर्यंत नेताना थोडा 'झिग-झॅग' हालवा. यामुळे मस्कारा सर्व पापण्यांना समान प्रमाणात लागतो.
खालच्या पापण्यांना मस्कारा लावताना ब्रश उभा धरून हलक्या हाताने लावावा.
जर तुम्हाला जास्त घनदाट लूक हवा असेल, तर पहिला थर सुकल्यावरच दुसरा कोट लावा जर पापण्यांना जास्त मस्कारा लागला, तर दोन पापण्यांच्या मध्ये टिश्यू पेपर ठेवून डोळे हलके बंद करा.