Manasvi Choudhary
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत आणि आता शहराचा महापौर कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
तुम्हाला माहितीये का? महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात त्यांना देखील मंत्र्याप्रमाणेच मानधन आणि सुविधा असतात.
यानुसार जाणून घेऊया महापौरला दर महिन्याला किती पगार मिळतो आणि नेमक्या काय सुविधा असतात.
महापौरला दर महिन्याला 40,000 ते 50,000 रूपये मानधन मिळते. पुणे, ठाणे, नागपूर महापौरना 30,000 ते 35,000 महिना मानधन मिळते तर इतर शहरातील महापौरना 20,000 ते 25,000 महिना मानधन मिळते.
महापौरसाठी शासकीय बंगला, शासकीय गाडी व वैयक्तिक ड्रायव्हर असतो. या गाडीवर महानगरपालिकेचे चिन्ह आणि लाल/निळा दिवा असतो.
महापौरांच्या संरक्षणासाठी पोलीस सुरक्षा असते. शहरात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांचे किंवा मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी महापौरांना स्वतंत्र निधी मिळतो.
महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असते. ज्याचे संपूर्ण शहरावर नियंत्रण असते. आरोग्य, शिक्षण, पाणी, सांडपाणी, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा यां कामांची जबाबदारी असते.