ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिपस्टिक हा मेकअपचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय लूक अपूर्ण दिसतो. लिपस्टिक तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणयाचे काम करते.
तुमच्या लिपस्टिकचा शेड नीट लावण्यासाठी आणि परिपूर्ण लूक मिळवण्यासाठी या तीन पद्धती वापरा करा. जाणून घ्या
सर्वात आधी तुमचे ओठ एक्सफोलिएट करा. यासाठी तुम्हाला लिप स्क्रब किंवा साखर ओठांवर लावावे लागेल. यामुळे डेड त्वचा निघून जाण्यास मदत होईल.
त्यानंतर, ओठांना लिप बाम किंवा व्हॅसलीनसारखे हलके मॉइश्चरायझर लावा. यामुळे ओठ हायड्रेट राहतील.
लिपस्टिक लावण्याआधी लिप लाइनरने तुमच्या ओठांच्या कडांभोवती फिरवून घ्या. यामुळे तुमच्या ओठांचा योग्य आकार दिसून येईल.
नंतर लिप लाइनरच्या खाली ओठांवर रिकाम्या जागी लिपस्टिक लावा आणि ती सेट करा. लिपस्टिक लाइनरच्या बाहेर जाऊन देऊ नका.
एक टिशू पेपर घ्या. त्यावर तुमचे ओठ ठेवून टॅप करा आणि लिपस्टिक सुकवा. यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.
लिपस्टिक जास्त काळ टिकवण्यासाठी, मॉइश्चरायझर लावल्यानंतर ओठांवर फाउंडेशन लावावे.