Manasvi Choudhary
केस गळणे, केस कोरडे होणे यासारख्या समस्येने सध्या महिला आणि पुरूष त्रस्त आहेत.
निरोगी केसांसाठी योग्य निगा राखणे गरजेचे आहे. केसांना योग्य वेळी तेल लावणे महत्वाचे आहे.
केस धुण्याआधी तुम्ही १ तास आधी केसांना तेल लावावे तुमचे केस जर कोरडे असतील तर तुम्ही दोन तासाआधी केसांना तेल लावा.
केसांना तेल लावताना केस कोरडे करून लावा. ओल्या केसांवर तेल लावल्याने केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते.
केसांच्या मुळांसोबतच केसांच्या खालच्या टोकांनाही व्यवस्थित तेल लावा. यामुळे केस धुताना शॅम्पूमुळे ते जास्त कोरडे होत नाहीत
केसांना तेल लावण्यापूर्वी केसं कंघव्याने विंचरून घ्यावे यामुळे केसांतील गुंता कमी होतो.
कोमट तेल केसांना लावल्यामुळे टाळूचा रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांना खोलवर पोषण मिळते.
केसांना तेल लावल्यानंतर बोटांनी हलक्या हाताने ५-१० मिनिटे मसाज करा