Shraddha Thik
जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर तुम्ही मतदान करू शकत नाही. जर तुम्ही तुमचे मतदार कार्ड बनवले नसेल तर तुम्ही घरबसल्या सहज अर्ज करु शकता.
निवडणुकीदरम्यान मतदान करण्यासाठी मतदार कार्ड आवश्यक आहे. मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करता येत नाही.
तुम्हीही मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी सरकारी ऑफिसला फेऱ्या मारत असाल तर तुम्हाला यापुढे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करु शकता.
मतदार कार्डसाठी, निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. या चरणांचे अनुसरण करून तुम्ही घरबसल्या मतदार ओळखपत्र मिळवू शकता.
निवडणूक आयोगाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/registration.aspx या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठावरील राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर क्लिक करा.
यानंतर, Registration Of New Voter च्या टॅपवर क्लिक करा. यानंतर, फॉर्म-6 डाउनलोड करा, माहिती भरा आणि सबमिट करा.
सबमिशन केल्यानंतर, ई-मेल आयडीवर लिंक प्राप्त होईल. या लिंकच्या मदतीने तुम्ही मतदार ओळखपत्र अर्जाची स्थिती सहजपणे ट्रॅक करू शकता आणि मतदार कार्डबद्दल माहिती मिळवू शकता.
या सोप्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, मतदार ओळखपत्र एका आठवड्यात तुमच्या घरी पाठवले जाते. या सर्व प्रक्रिया स्मार्टफोनच्या मदतीने घरबसल्या सहज करता येतात.