Surabhi Jayashree Jagdish
इंटरव्यूमध्ये स्वतःबद्दल सांगण्याचा प्रश्न आला की अनेकदा आपल्याला भीती वाटते. अशावेळी काय बोलावं आणि कुठून सुरूवात करावी हे सुचत नाही. म्हणून पहिल्याच प्रश्नात गोंधळ उडतो.
इंटरव्यू ही प्रत्येकाला द्यावी लागणारी प्रोसेस आहे. विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारे व्यावसायिक असो, सर्वांना तो द्यावा लागतो. करिअरच्या पुढच्या टप्प्यासाठी तो आवश्यक असतो.
बहुतेक इंटरव्यूमध्ये सुरुवातीलाच एकच प्रश्न विचारला जातो. तुम्ही स्वतःबद्दल थोडक्यात सांगा असं रिक्रूटर विचारतो. हा प्रश्न साधा वाटला तरी महत्त्वाचा असतो.
हा प्रश्न खूप सोपा आहे असं अनेकांना वाटतं. मात्र याचं उत्तर तुमची निवड ठरवू शकते.
पहिली छाप याच उत्तरातून पडते.
उगाच काहीही बोलण्यापेक्षा नेमकं आणि जोडलेलं उत्तर द्या. स्वतःबद्दल छोटी आणि स्पष्ट माहिती सांगा.यामुळे रिक्रूटरचं लक्ष तुमच्यावर राहतं.
इंटरव्यूला जाण्यापूर्वी उत्तरांची तयारी करून ठेवा. फक्त अनुभव सांगण्यापेक्षा नव्या भूमिकेनुसार उत्तर द्या. जॉब प्रोफाइलशी जुळणारे मुद्दे मांडावेत.
ज्या पदासाठी अप्लाय केलंय त्यासंबंधी माहिती द्या. गेल्या कंपनीतील कामगिरी आणि यशाबद्दल थोडक्यात सांगा. गेल्या ठिकाणी तुमची निवड का झाली होती हेही स्पष्ट करा.