Siddhi Hande
भारतीय क्रिकेट टीमची उप कर्णधार स्मृती मंदाना चांगलीच चर्चेत आली आहे.
स्मृती मंदानाचे पलाश मुच्छलसोबतचे लग्न मोडले आहे. यानंतर ती पुन्हा एकदा क्रिकेट प्रॅक्टिस करताना दिसली.
स्मृतीने आपले वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्य वेगवेगळे ठेवले आहे. तिने लग्न मोडल्याचा कोणताही परिणाम आपल्या खेळावर होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्मृती मंदाना २१ ते ३० डिसेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टी २० सीरीजमध्ये खेळताना दिसणार आहे.
यानंतर स्मृती वुमन प्रीमियर लगीमध्येही खेळताना दिसणार आहे. ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कॅप्टन आहे.
दरम्यान, स्मृतीचा मूळची कुठली, तिचे वय काय असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहे.
स्मृती मंदानाचा जन्म हा १७ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला.
स्मृती सध्या २९ वर्षांची आहे. स्मृती ही मूळची सांगलीची आहे. तिचे कुटुंब सांगलीला असते.