Manasvi Choudhary
मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृ भाषा आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मराठी भाषा बोलली जाते.
मराठी भाषेची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठी भाषेमध्ये कलाकृतींची निर्मीती केली.
भाषेचा इतिहास मूळ पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत भाषेतून विकसित होत गेला.
साधारणपणे इ. स. १५०० पूर्वी सातवाहन साम्राज्याच्या काळात मराठी भाषेचा विकास झाला.
मराठी भाषेतील पहिले वाक्य 'श्री चामुण्डेराये करविले' श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. यानंतर मुंकुदराज व संत ज्ञानेश्वर यांनी मराठीची वैशिष्ट्ये ग्रंथात मांडली आहेत.
१११० मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे.
भगवदगीता सर्वांना समजावी यांचअनुशगांने ज्ञानेश्वरी वा भावार्थ दीपिक यांग्रथाचे लेखन मराठी भाषेतून करण्यात आले.
काळानुसार मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठी भाषेच्या स्वरूपात अनेक बदल झालेली दिसतात. सत्ता बदल होत गेली तसतसा मराठी भाषेतही बदल झालेला दिसतो आहे.
१२५० ते १३५० या काळात यादवी सत्ता होती, पुढे १६०० ते १७०० मध्ये छत्रपती शिवरायांची सत्ता, १७०० ते १८१८ पेशवाई सत्ता आणि १८१८ पासून इंग्रजी सत्ता यामुळे काळानुरूप मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात.
पुढे मराठी मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी, मराठवाडी मराठी असे प्रकार पडले गेले.