Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात माठातील पाणी पिणे हे आरोग्यासाठी अमृतासमान आहे, उन्हाळ्यात माठातील थंड गार पाणी सर्वजण पितात.
फ्रिजच्या थंड पाण्यापेक्षा माठातील थंड पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे.
परंतु तुम्हाला माहितीये का मातीच्या माठाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे. अनेकजण एकदा माठ भरले की तीन ते चार दिवस त्यातील पाणी पितात.
एकदा माठ भरला की त्यातील पाणी वेळीच बदलले पाहिजे नाहीतर आरोग्यावर परिणाम होतो.
अनेक महिला एकदा माठात पाणी भरलं की संपेपर्यंत नवीन पाणी भरत नाही. मात्र अनेक दिवस माठात पाणी साचल्याने जंतू तयार होऊ शकतात.
माठातील पाणी १२ ते १८ तासांनी बदललं आवश्यक आहे. तुमच्या घरातील माठ मोठा असेल पाणी संपत नसेल तरी ते बदलले पाहिजे.
माठातील पाणी जास्त दिवस ठेवल्यास माठाच्या आतल्या भागावर चिकट थर साचते.
NEXT: Langda Mango Name History: 'लंगडा' आंबा, आंब्याचं नाव 'लंगडा' कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास