Kitchen Chimney: किचन चिमणीचा फिल्टर किती दिवसांनी स्वच्छ करावा?

Surabhi Jayashree Jagdish

तेल जमा होणं

किचन चिमणी स्वयंपाक करताना तयार होणारा धूर, तेल आणि अन्नाचा वास बाहेर काढण्यास मदत करते. मात्र वापर वाढला की तिच्या फिल्टरमध्ये हळूहळू तेल आणि चिकट घाण जमा होते. यामुळे हवेचा प्रवाह कमी होऊ शकतो आणि मोटरला जास्त मेहनत करावी लागू शकते.

Vastu Shastra | saam tv

बाफल फिल्टर किती दिवसांनी स्वच्छ करावा?

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये बाफल फिल्टर असलेल्या चिमण्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या फिल्टरमधील वाकड्या धातूच्या पट्ट्यांमुळे धुरातील तेल वेगळं होतं. रोजचा स्वयंपाक करत असल्यास हा फिल्टर साधारण तीन ते चार आठवड्यांनी स्वच्छ करावा. तर वारंवार तळण किंवा फोडणी करत असल्यास दर दोन आठवड्यांनी स्वच्छ करा.

Kitchen chimney maintenance | saam tv

योग्य पद्धत

फिल्टर काढण्यापूर्वी चिमणी बंद करा आणि तिचं कनेक्शन काढा. त्यानंतर फिल्टर कोमट पाण्यात थोडे भांडी धुण्याचे लिक्विड मिसळून भिजवा आणि त्यावरील चिकट तेल हलक्या हाताने स्वच्छ करा. फिल्टर पुन्हा लावण्यापूर्वी तो पूर्णपणे वाळू द्या, जेणेकरून त्यावर पाणी राहणार नाही.

Baffle filter cleaning | saam tv

मेश फिल्टर किती वेळा स्वच्छ करावा?

मेश किंवा कॅसेट फिल्टरमध्ये बारीक छिद्रं असलेले अनेक थर असतात त्यामुळे त्यामध्ये तेल आणि घाण लवकर अडकू शकते. स्वयंपाकघरात वारंवार तळणं आणि फोडणी होत असल्यास हा फिल्टर दर एक ते दोन आठवड्यांनी स्वच्छ करावा लागू शकतो.

Charcoal filter replacement | saam tv

चारकोल फिल्टर किती दिवसांनी बदलावा?

चारकोल किंवा कार्बन फिल्टरचा वापर प्रामुख्याने डक्टलेस चिमण्यांमध्ये स्वयंपाकाचा वास कमी करण्यासाठी केला जातो. या चिमण्या हवा बाहेर सोडण्याऐवजी तिच फिल्टर करून पुन्हा स्वयंपाकघरात सोडतात. सामान्य चारकोल फिल्टर सहसा पाण्याने धुता येत नाहीत, त्यामुळे ते स्वच्छ करण्याऐवजी वेळेवर बदलणं आवश्यक असते.

Kitchen chimney oil buildup | saam tv

योग्य वेळ कोणती?

चारकोल फिल्टर किती दिवसांनी बदलावा हे चिमणीचा वापर आणि तिच्या मॉडेलवर अवलंबून असते. सामान्य प्रकारचा चारकोल फिल्टर साधारण दोन ते तीन महिन्यांनी बदलावा लागू शकतो. काही फिल्टर पुन्हा वापरता येण्यासारखे असतात, त्यामुळे अशा फिल्टरची स्वच्छता करण्यासाठी कंपनीने दिलेल्या सूचनांचं पालन करा.

Chimney filter maintenance | saam tv

फिल्टरलेस आणि ऑटो-क्लीन चिमण्या

फिल्टरलेस चिमणीमध्ये पारंपरिक पद्धतीने धुता येणारा फिल्टर नसतो पण त्यामुळे तिची स्वच्छता करण्याची गरज संपत नाही. अशा चिमणीमध्ये जमा होणारे तेल नियमितपणे गोळा करून त्याची वेगळ्या पद्धतीने स्वच्छ करावी.

Kitchen chimney suction problem | saam tv

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Amla beetroot carrot juice | saam tv
येथे क्लिक करा