Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्यात शरीरातून जास्त प्रमाणात घाम येतो. यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. म्हणूनच या काळात पाणी पिण्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं हा सर्वात सोपा मार्ग आहे. इतर पेयांपेक्षा पाणी शरीराला जास्त फायदेशीर ठरतं. म्हणून नियमित पाणी पिण्याची सवय लावणं आवश्यक आहे.
काही लोकांना दिवसभरात पाणी पिण्याची आठवत राहत नाही. यामुळे त्यांना थकवा आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या जाणवतात. ही सवय बदलणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
सामान्य व्यक्तीने दिवसभरात किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यावं. हे प्रमाण शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी योग्य मानलं जातं. यामुळे शरीर व्यवस्थित कार्य करत राहतं.
जर तुम्ही उन्हात जास्त वेळ राहात असाल किंवा व्यायाम करत असाल तर शरीरातून अधिक पाणी बाहेर पडतं. अशावेळी पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं.
सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी पिणं फायदेशीर असतं. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.
एकाच वेळी खूप पाणी पिणं टाळावं. हळूहळू आणि थोडं-थोडं पाणी पिणं अधिक चांगलं असतं. तसंच खूप थंड पाणी टाळल्यास पचन सुरक्षित राहतात.