Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
हिवाळा या ऋतूमध्ये थंडीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. हिवाळ्यात गरमा गरम पदार्था आहारात समावेश केला जातो. चहा, सूप हे पदार्थांचे नियमितपणे सेवन केले जाते.
अशातच हिवाळ्यात संपूर्ण दिवसभर किती पाणी प्यावे याविषयी अनेकांना प्रश्न आहे. हिवाळ्यात थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे फायद्याचे आहे यामुळे शरीर हायड्रेट राहते.
हिवाळ्या तुम्ही थंड पाणी पिऊ नका. पाणी कोमट करून पिणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
हिवाळ्यात प्रत्येक व्यक्तीने दिवसात ८ ते १० ग्लास पाणी प्यावे म्हणजेच कमीत कमी २ ते ३ लीटर पाणी प्यावे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होतो. शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.