ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या इंटरनेट युगात YouTube सर्वत्र लोकप्रिय झाले असून, लाखो लोकांसाठी ते कमाईचे महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे.
चला जाणून घेऊया, हे प्रसिद्ध व्हिडिओ प्लॅटफॉर्म एका दिवसात किती मोठी कमाई करून उत्पन्न मिळवते.
YouTube चे कमाईचे तंत्र साधे आहे, ते प्रेक्षकांना दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवते.
कंपन्या जाहिरातींसाठी YouTube ला पैसे देतात आणि त्यातील काही रक्कम YouTube कंटेंट क्रिएटर्ससोबत वाटून त्यांना उत्पन्न मिळवून देते.
अल्फाबेट इंक. (गुगलची मूळ कंपनी), प्रत्येक तिमाहीत आपली आर्थिक कमाई आणि नफा यासंबंधी आकडे सार्वजनिक करते.
२०२४ च्या अहवालानुसार, YouTube ने एका वर्षात सुमारे ३१ अब्ज डॉलर, म्हणजे सुमारे २.५ लाख कोटी रुपये कमावले.
YouTube ची कमाई मुख्यतः कंटेंट क्रिएटर्सकडून होते. जाहिरातींमधून मिळालेल्या उत्पन्नापैकी ५५% क्रिएटर्सला दिले जाते, तर ४५% YouTube स्वतःसाठी ठेवते.