Surabhi Jayashree Jagdish
500 ग्रॅम जिलेबी खाल्ल्याने शुगरचं प्रमाण झपाट्याने वाढू शकतं. विशेषतः डायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास जास्त होऊ शकतो.
जिलेबी ही एक डीप फ्राईड मिठाई आहे, ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते.
500 ग्रॅम जलेबीमध्ये अंदाजे 250–300 ग्रॅम साखर असू शकते.
इतकी साखर खाल्ल्याने रक्तातील शुगरचे प्रमाण अचानक वाढू शकते.
ज्यांना डायबिटीज नाही अशा व्यक्तींचं देखील ब्लड शुगरचं प्रमाण खूप जास्त वाढू शकतं.
डायबेटिक व्यक्तीमध्ये हे प्रमाण 300 mg/dL किंवा त्याहून जास्त जाऊ शकते, जे धोकादायक आहे.
500 ग्रॅम जलेबी खाल्ल्याने 1000 पेक्षा जास्त कॅलरीज मिळतात.
अतिरिक्त साखरेमुळे थकवा, भोवळ, वारंवार लघवी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.