Tea and blood sugar: दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा दुधाचा चहा प्यायला तर ब्लड शुगर किती प्रमाणात वाढते?

Surabhi Jayashree Jagdish

चहा

दिवसाला २ पेक्षा जास्त वेळा दुधाचा चहा प्यायल्याने ब्लड शुगर वाढण्याचा धोका काही प्रमाणात वाढू शकतो. विशेषतः जर चहात साखर जास्त प्रमाणात असेल. दुधातील लॅक्टोजही थोड्या प्रमाणात शुगर वाढवतो, त्यामुळे वारंवार सेवन केल्यास परिणाम अधिक जास्त शकतो.

tea and blood sugar

साखरेचं प्रमाण

एका कप दुधाच्या चहात साधारण ५-१० ग्रॅम साखर असते. ही साखर थेट रक्तातील ग्लुकोज वाढवते. साखर पटकन पचते आणि त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढतं.

diabetes risk tea

दुधातील लॅक्टोजचा प्रभाव

दुधामध्ये नैसर्गिक साखर म्हणजे लॅक्टोज असतं, जे हळूहळू ग्लुकोजमध्ये बदलतं. त्यामुळे चहामुळे फक्त साखरच नव्हे तर दुधामुळेही शुगर वाढते.

sugar in tea

वारंवार सेवन

दिवसभरात अनेक वेळा चहा घेतल्यास शरीराला वारंवार इन्सुलिन तयार करावं लागतं. यामुळे काही लोकांमध्ये इन्सुलिन रेसिस्टन्स वाढण्याची शक्यता असते. परिणामी दीर्घकाळात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं कठीण होऊ शकतं.

lactose impact glucose

मेटाबॉलिक प्रतिक्रिया

प्रत्येक व्यक्तीची मेटाबॉलिक प्रतिक्रिया वेगळी असते. त्यामुळे शुगर वाढण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यात ही वाढ जास्त आणि पटकन होऊ शकते.

insulin resistance causes

रिकाम्या पोटी चहा पिण्याचा परिणाम

रिकाम्या पोटी चहा घेतल्यास साखर लवकर शोषली जाते आणि ब्लड शुगर जलद गतीने वाढते. त्यामुळे सकाळी पहिल्यांदा गोड चहा टाळणं योग्य असतं.

healthy tea habits

चहाचं प्रमाण आणि वेळ

दिवसाला १-२ कप चहा मर्यादेत घेतल्यास फारसा त्रास होत नाही. मात्र ३-४ कप किंवा त्यापेक्षा जास्त घेतल्यास शुगरवर परिणाम स्पष्ट दिसतो. विशेषतः जेवणानंतर लगेच गोड चहा घेतल्यास शुगर अधिक वाढू शकते.

tea consumption limit

Bra design: ब्रामध्ये एकसारखे 3 हुक का असतात? 99 टक्के मुलींनाही माहिती नसेल कारण

Bra design | SAAM TV
येथे क्लिक करा