Surabhi Jayashree Jagdish
उन्हाळ्याच्या दिवसात काही थंड प्यावं म्हणून आपण उसाचा रस पितो. उसाचा रस जवळपास प्रत्येकाला आवडतो. आजकाल उसाच्या रसाच्या गाड्यांवर गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते.
अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, उसाचा रस प्यायल्याने ब्लज शुगर वाढते का? रक्तातील साखर वाढेल या भीतीने अनेकजण उसाचा रस पीत नाहीत.
मोठा प्रश्न असतो तो मधुमेही रूग्णांसाठी...ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी उसाचा रस प्यावा की नाही हा मोठा प्रश्न असतो.
उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच या रसात सुक्रोज जास्त असून ती शरीरात पटकन शोषली जाते. त्यामुळे लगेच उर्जा मिळते मात्र शुगरही वाढते.
उसाचा रस प्रमाणात पिणं महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात प्यायल्यास तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते.
एक ग्लास उसाचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण यात सुमारे २५-५० ग्रॅम नैसर्गिक साखर आणि जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असतो. यामुळे काही तासांत साखरेत लक्षणीय वाढ (सुमारे ७५ mg/dL पर्यंत) होऊ शकते.
उसाच्या रसात कॅलरीचं प्रमाणही जास्त असते. त्यामुळे जास्त प्रमाणात उसाचा रस प्यायल्यास तुमचं वजनही वाढू शकतं.