Saam TV News
रिक्षाचालक एका दिवसाला किती कमाई करत असेल? असा प्रश्न तुम्हा आम्हाला नेहमीच पडत असेल.
रिक्षाचालकाची दिवसाची कमाई ही ८०० ते १५०० च्या घरात आहे.
रिक्षाचालकांची कमाई ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.
काही रिक्षाचालक हे ओला, उबेरसाठी काम करतात. त्यामुळे त्यांची कमाई ही कमी जास्त असू शकते.
काही रिक्षाचालकांची कमाई हे दिवसाला किती फेऱ्या मारल्या जातात यावर अवलंबून असते.
काही ठिकाणी रिक्षा या मीटरवर चालतात. त्यामुळे मीटरनुसार रिक्षा चालवणाऱ्यांची कमाई ही देखील कमी जास्त असू शकते.
मुंबई उपनगरात रिक्षाचालकांचं प्रमाण खूप जास्त आहे. याचा कमाईवर परिणाम होऊ शकतो.
याऊलट पुणेसारख्या शहरात रिक्षाचालकांची कमाई जास्त असू शकते.