Ankush Dhavre
वाघ हा शक्तिशाली, धाडसी आणि काटक प्राणी आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो.
भारतीय संस्कृती कला यामध्ये वाघाला मानाचे स्थान आहे.
भारतात रॉयल बंगाल टायगर ही वाघाची सर्वात मोठी प्रजाती आढळते. जगातील एकूण वाघांपैकी 70% वाघ भारतात आहेत.
वाघ हा परिसंस्थेचा प्रमुख घटक असून, त्याच्या अस्तित्वाने जंगलाचे आरोग्य ठरते. वाघ असणे म्हणजे जंगल टिकून आहे, असे समजले जाते.
वाघ जंगलातील शृंखलाबद्ध अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो शिकार करून प्राण्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवतो आणि परिसंस्था संतुलित ठेवतो.
1973 मध्ये भारत सरकारने वाघांच्या संवर्धनासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केला. वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करून त्याचे संरक्षण वाढवले
वाघ पाहण्यासाठी अनेक अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे स्थानिक रोजगार वाढतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मदत होते.
वाघाच्या शरीरावरील पट्टे प्रत्येक वाघासाठी वेगळे असतात, त्यामुळे तो अनोखा प्राणी आहे. त्याचे पिवळसर-केशरी शरीर आणि काळे पट्टे त्याला इतर प्राण्यांपासून वेगळे करतात.