Surabhi Jayashree Jagdish
पाणीपुरी ही आपल्या प्रत्येकाला आवडते. पाणीपुरीचं नाव काढलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.
मुंबईतल्या सर्वोत्तम स्ट्रीट फूड पैकी एक म्हणजे पाणीपुरी.
मात्र तुम्हाला माहितीये का की, ताज हॉटेलमध्ये पाणीपुरीची किंमत काय आहे.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पाणीपुरीची किंमत ही सामान्य रस्त्यावरील पाणीपुरीच्या तुलनेत खूप जास्त असते
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पदार्थांच्या किमती त्यांच्या लक्झरी सेवा, वापरल्या जाणाऱ्या घटकांची गुणवत्ता आणि ब्रँड व्हॅल्यू यावर अवलंबून असतात.
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ताज लँड्स एंडमधील ॲट्रियम मेनूमध्ये "Paani Poori" ची किंमत अंदाजे ₹695 आहे.
यात फुगलेल्या रव्याच्या पुऱ्या, मसालेदार मूग आणि चणा, तसंच आंबट-तिखट पुदिन्याचं पाणी यांचा समावेश असतो.