Taj Mahal construction cost: ताजमहाल बनवणयासाठी त्या काळात किती खर्च आला होता?

Surabhi Jayashree Jagdish

ताजमहाल

जगातील सातव्या आश्चर्यांपैकी ताजमहाल हा आग्र्यातील एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. त्याच्या अप्रतिम सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटक तो पाहायला येतात. ताजमहालाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

मुघल बादशाह शाहजहान

ताजमहाल मुघल बादशाह शाहजहानने १६५३ मध्ये बांधला होता. हा त्याचा सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. त्याच्या बांधकामासाठी अनेक वर्षे लागली.

कोणासाठी बांधला ताजमहाल?

शाहजहान यांनी पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता. तिच्या प्रेमाची आठवण म्हणून ही इमारत उभी करण्यात आली. त्यामुळे ताजमहालाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

प्रेमाचं स्मारक

जगभरातील लोक ताजमहालला प्रेमाचं स्मारक म्हणून ओळखतात. त्याच्या सौंदर्यामुळे तो आजही लोकप्रिय आहे.

खर्च

तुम्हाला माहितीये का की, ताजमहाल बांधण्यासाठी किती खर्च झाला होता? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

इतके कोटी लागले

अहवालानुसार ताजमहाल बांधण्यासाठी सुमारे ३२ मिलियन रुपये (३.२० कोटी रुपये) खर्च आला होता. हा खर्च त्या काळात अत्यंत मोठा मानला जात होता.

मजूर

जवळपास २० हजार मजुरांनी ही इमारत बांधली होती. ताजमहाल पूर्ण होण्यासाठी तब्बल २० वर्षे लागली. इतक्या दीर्घ काळाच्या मेहनतीनंतर हे स्मारक तयार झालं.

आताची किंमत

पांढऱ्या संगमरवरातून बनलेली ही इमारत आज जवळपास ७५०० कोटी रुपयांच्या किमतीची आहे. तिचं मूल्य तिच्या सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे अधिक वाढलंय.

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

येथे क्लिक करा