Surabhi Jayashree Jagdish
बाईकच्या पुढच्या टायरमध्ये २५ ते ३० PSI हवा ठेवली जाते. या प्रमाणात हवा असल्यास टायर रस्त्यावर योग्य प्रकारे बसतो. तुमच्या बाईकसाठी कंपनीने वेगळा दाब सांगितला असेल, तर तोच दाब ठेवावा.
मागच्या टायरमध्ये साधारण ३० ते ३५ PSI हवा ठेवली जाते. मागच्या टायरवर बाईकचा आणि प्रवाशाचा जास्त भार येत असल्यामुळे त्याचा दाब पुढच्या टायरपेक्षा जास्त असू शकतो. तरीही तुमच्या बाईकच्या मॉडेलनुसार योग्य हवा किती आहे, हे कंपनीच्या सूचनांनुसार पाहावं.
प्रत्येक बाईकच्या टायरचा आकार आणि रचना सारखी नसते. त्यामुळे सर्व बाईकसाठी एकच PSI योग्य असेल असे नाही.
टायरमध्ये खूप जास्त हवा असल्यास रस्त्याशी टायरचा संपर्क बदलू शकतो. त्यामुळे बाईकची रस्त्यावरची पकड म्हणजेच ग्रिप कमी होऊ शकते. वळण घेताना आणि ब्रेक लावताना योग्य टायर प्रेशर महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर टायरच्या आतील हवा गरम होऊन तिचा दाब वाढू शकतो. त्यामुळे आधीच जास्त हवा भरलेली असेल तर टायरचा दाब आणखी वाढू शकतो. म्हणून उन्हाळ्यात टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त हवा भरू नये.
उन्हाळ्यात टायरची हवा वेळोवेळी तपासलं पाहिजे आहे. हवा कमी किंवा जास्त असल्यास ती योग्य प्रमाणात करून घ्यावी. टायर प्रेशर तपासताना शक्यतो टायर थंड असताना तपासणी करावी.
टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असल्यास बाईक चालवताना संतुलन आणि नियंत्रण राखण्यास मदत होते. योग्य टायर प्रेशरमुळे बाईक चालवण्याचा अनुभवही अधिक सुरळीत राहतो. त्यामुळे उन्हाळ्यात बाईकची सुरक्षित आणि सुरळीत राइडिंगसाठी टायरची हवा योग्य ठेवणे आवश्यक आहे.