ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि शक्तीशाली प्राणी आहे. परंतु तुम्हाला माहितीये का, हत्ती किती वर्षे जगतो. जाणून घ्या.
हत्ती हा बलवान तसेच बुद्धिमान प्राणी आहे. हत्ती इतका बलवान आहे की, तो ट्रकलाही उलटू शकतो.
हत्तीचे वजन हे ३००० ते ४००० किलोपर्यंत असू शकते.
जन्मल्यानंतर हत्तीच्या बाळाचे वजन ९० ते १२० किलोपर्यंत असते.
माहितीनुसार, हत्ती हा ५० ते ६० वर्षांपर्यंत जगतो.
एक अफ्रिकन हत्ती ६० ते ७० वर्ष वर्षांपर्यंत जगतो. तर हत्तीण हे ८० वर्षांपर्यंतही जगू शकतात.
हत्ती हे सामाजिक प्राणी असतात. ते आपल्या कुटुंबासोबत राहतात. आणि एकमेकांची काळजी घेतात.