Shruti Kadam
भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणीला ओळखले जाते आहे.
नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात.
मादा चिमणी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.
चिमणी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत ते भारतातील प्रत्येक गल्लीबोळ्यात आढळते.
भारतात हिच्या काश्मिरी आणि वायव्यी अशा किमान दोन उपजातीही आढळतात.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सूर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो
चिमणी हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते.
चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते.
पण, सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जागल्याची माहिती आहे. तर, सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली होती.