Surabhi Jayashree Jagdish
आज जगभरात घोड्यांच्या २०० हून अधिक वेगवेगळ्या जाती आढळतात.
या सर्व जातींतील घोड्यांचं आयुष्य वेगवेगळं असू शकतं.
सरासरी घोडा साधारण २५ ते ३० वर्षे जगतो.
चांगली काळजी घेतल्यास अनेक घोडे याहूनही जास्त काळपर्यंत जिवंत राहू शकतात.
एक जंगली घोडा सरासरी १५ ते १६ वर्षांपर्यंत जिवंत राहतो.
घोड्यांचं सरासरी आयुष्य अनेक घटकांवर अवलंबून असतं. ज्यामध्ये घोड्याची जात, त्याचा आकार आणि जीवनशैली यांचा समावेश होतो.
याच कारणामुळे घरगुती घोडे जंगली घोड्यांच्या तुलनेत जास्त काळ जगतात.