Manasvi Choudhary
पावसाळ्यात केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
आठवड्यातून किती वेळा केस धुणे असा प्रश्न महिला- मुलींना असतो.
पावसाळ्यात केस ओले, घाम आणि तेलकट होतात.
दाट आणि कुरळे केस असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन- तीन वेळा केस धुवावे.
केस तेलकट असतील तर तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवावे.
तेलकट केस धुण्यासाठी तुम्ही ड्राय शॅम्पूचा वापर करू शकता.
रोज केस धुतल्याने केसांचा पोत खराब होतो. सततच्या शॅम्पूच्या वापरामुळे टाळू कोरडी होते.
रोज केस धुतल्याने केस गळती व त्वचेच्या समस्या निर्माण होतात.