Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने केस गळणे, कोंडा, चिपचिपेपणा या केसांच्या समस्या उद्भवतात.
यामुळे अनेक लोक या दिवसांमध्ये रोज केस धुतात. पण रोज केस धुणे आरोग्यासाठी चांगले नसते. म्हणून पावसाळ्यात आठवड्यातून केस किती वेळा धुवावे. केस धुण्याचं प्रमाण किती असावं ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पावसाळ्यात केस आठवड्यातून २ ते ३ वेळा धुणे पुरेसे असते. जर तुम्ही दररोज केस धुतले, तर टाळूवरचे नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात.
जर तुमचे केस खूप तेलकट असतील, तर तुम्ही एक दिवसानंतर केस धुणे फायद्याचे राहील. पावसाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा धुणे पुरेसे असते.
पावसाळ्यात केस धुण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे. केस धुतल्यानंतर ते कोरडे करा कारण ओल्या केसांमुळे कोंडा होण्याची शक्यता अधिक असते.
पावसाळ्यात केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरा. अति गरम पाण्याने केस धुतल्यास केसांचा पोत खराब होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.